फोनवरचंं प्रेम.....
कालांतराने ईशाला या खोट्याच ओझ जड वाटायला लागलं. तिला तिची चूक काबुल करायची इच्छा तर होती पण तिला परिणामांची भीती होती. तिला वाटू लागले की जर हे सत्य रवीला समजले तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो माझ्यापासून लांब जाईल. त्यापेक्षा मीच त्याच्याशी बोलणार नाही जेणेकरून त्याला लागलेली माझी सवय तुटेल आणि त्याला माझ्यापासून लांब जाणं सोप होईल.
इच्छेविरुद्ध ती त्याच्याशी
तुटक वागू लागली. नेहमीसारखं वेळ काढून बोलणं तिने कमी केलं. तिला देखील माहिती
होत की या सगळ्यात रवीची काहीच चूक नाही तरी देखील त्याच्याशी असं वागून मी खूप
वाईट करतीये हे तिला कळत होत.
त्याला असं दूर लोटणं तिला
कठीण जात होत. पण सत्य लपवून खोटेपणाने जगणंसुद्धा तिला जमत नव्हत.
इकडे रवीला काहीच कळत नव्हत
की इशा अशी का वागते. त्याचं काय चुकलंय की ती त्याला अशी दूर लोटतीये. तो सगळ्या
परीने तीला विचारायचा, तीला समजवायचा प्रयत्न करत होता. ईशाला हे सगळ कळतही होत.
झोपलेल्याला उठवू शकतो पण जो जागा आहे त्याला कसं काय उठवायचं? अशीच काहीशी ईशाची
अवस्था होती. पण सत्य सांगण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. ती रवीला गमावून बसेल
याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती. कारण ही गोष्ट, हे सत्य सांगायची वेळ
मागे निघून गेली होती असे तिला वाटत होते.
बघता बघता एक वर्ष सरलं.
ईशाला वाटलं होत; वेळ जाईल तशी त्यांची एकमेकांना लागलेली सवय सुटेल; पण तसं काहीच
घडलं नाही.
जे घडत होत त्याचा
दोघांनाही त्रास होत होता. ईशाच्या लाख प्रयात्नानीही तिला त्याच्यापासून लांब
जाता येत नव्हत. तीला रावीशिवाय जगायलाच जमतच नव्हत; पण तिच्या खोटेपणासोबत
आयुष्यात पुढे जाणदेखील शक्य नव्हत.
अखेर तिने त्याला खर काय ते
सांगायचा निर्णय घेतला. सगळी हिम्मत गोळा करून तिने रवीला फोन केला.
इशा – हॅलो, थांब रवी... तू
काही म्हणायच्या आत मला तुला काहीतरी खूप महत्वाच सांगायचय. जर मी हे आता बोलू
शकले नाही तर पुन्हा मला जड जाईल सगळ सांगायला.
रवी – (थोडा घाबरून आणि गोंधळलेल्या
स्तिथीत तिला विचारतो) इशा काय झालं? काय सांगायचं आहे तुला?
इशा – मला तुला एक गोष्ट
सांगायची आहे. गेले बरेच महिने... नव्हे वर्ष.... मला हे तुला सांगायचय.
तुला आठवतंय का मी तुला
एकदा अविनाश बद्दल सांगत होते?
रवी- खर तर मला आठवत
नाहीये. पण बोल ना, त्याचं काय?
इशा – तो.....त्याच....म्हणजे...
मी सांगणारच होते तुला आधीच पण....
रवी – काय झालायं इशा? कोण
अविनाश? आणि त्याचा काय संबंध इथे?
इशा – अविनाश वानखेडे. माझा
वर्गमित्र. दहावीपासून आम्ही एकत्रच होतो. तो माझा खूप चांगला मित्र होता.
रवी – हऽऽ...बरं मग?
इशा - तू जेव्हा मला
पहिल्यांदा फोन केला होतास त्याच्या काही महिन्यांपूर्वीच आमचं खूप मोठ भांडण झाल
होत.
रवी – कशावरून? असलं भांडण?
इशा – कॉलेज मध्ये असताना सगळ्यांना
वाटायचं की आम्ही एकत्र आहोत. पण तसं खरच काही नव्हत. खर सांगायचं झालं तर अविनाश
माझ्यासाठी एका चांगल्या मित्राहून अधिक जवळचा होता. तो माझ्या आयुष्यातला
महत्वाचा व्यक्ती होता. आमच्यात आगदीच प्रेम म्हणावं अस नव्हत; पण प्रत्येक सुख दुःखाचे
आम्ही साथीदार बनलो होतो. रवी, मला चुकीच समजू नकोस.
तुझ्यापासून हे सगळं
लपवायचं नव्हत रे....पण माझा धीरच होत नव्हता.
(हे सगळ ऐकताना त्याच्या
मनावर खोल घाव होत होते. तिचं बोलणं, तिचा एक अन एक शब्द त्याच्या मनाला
काट्यासारखा बोचत होता. तरीही रवी ईशाच बोलणं शांतपणे ऐकत होता.)
इशा – रवी मी तुला अंधारात
ठेवलं. मला माहिती आहे तुझा माझ्यावर असलेल्या विश्वासाला मी धक्का दिलायं. मला
स्वतःला तुझ्यापासून हे लपवणं चूक वाटत होत म्हणून मी.....
(रवी तिचं बोलणं मध्येच
थांबवतो.)
रवी – अच्छा, हे कारण होत
तर तुझ माझ्याशी तुटकपणे वागण्याचं? गेला वर्षभर मी विचार करून थकलोय. माझ्याकडून
काय चूक झालीये की तू अशी वागतेस? इशा, मला खर तर काहीच सुचत नाहीये हे सगळ ऐकल्यानंतर.. मला आता काहीच बोलायचं नाही आहे. आपण नंतर बोलू.
(एवढे बोलून रवी रागाने फोन ठेवतो)
त्यानंतर इशा बऱ्याचदा
रवीशी बोलण्यचा प्रयत्न करते पण रवीला तिचा प्रचंड राग आलेला असतो. तो तिच्या
कोणत्याच फोन आणि मेसेजचं उत्तर देत नाही.
असेच काही दिवस उलटून
जातात. ईशाला झाल्या प्राराचा पश्चाताप होतो. ती सर्वतोपरी रवीला समजवायचा प्रयत्न
करते; पण रवी अजूनही तिच्याशी बोलत नसतो. त्याला काही केल्या ईशाच हे खोट मान्य
नसतं.
(एकट्याने हे दुःख पचवणे
त्याला जड जात होत म्हणून न रहावता रवी ही गोष्ट आपल्या मित्राला सांगतो.)
रवी - आपण जिच्यावर जीवापाड
प्रेम केलंय. जिच्याशी आयुष्यातल्या लहान-मोठ्या, अगदी सगळ्या गोष्टी सांगितल्या..
तिनेच आपल्याला अंधारात ठेवलं. मान्य आहे तो तिचा भूतकाळ आहे; पण या नात्यात
येण्यापूर्वी आम्ही दोघांनी ठरवलं होत की कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही.
मला या गोष्टीचा त्रास नाही की माझ्या आगोदर आणखी कोणी तिच्या आयुष्यात होतं; पण
मला याच दुःख आहे की ती माझ्याशी खोट बोलली. जर ती हे खोट बोलू शकते तर आजवर तिने
अश्या अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या असतील. मला तिच्याशी यापुढे कधीच, कसलेच
संबंध ठेवायची इच्छा नाहीये.
अश्विन (रवीचा मित्र) – रवी,
तुला मी फक्त एकच प्रश्न विचारेन.... तुझ्याशी ती खोट बोलली, गोष्टी लपवल्या, तुला
आधारात ठेवलं, सगळं मान्य आहे. तुझं तिच्यावर चिडणं हे देखील सहाजिक आहे आणि हो तू
तिच्यावर रागावलाही पाहिजेस; पण हे सगळ करून तू तिच्याशिवाय राहू शकतोस का?
अश्विनचं बोलणं ऐकून रवी
निशब्द झाला. रागात त्याला तिच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमाची जाणीवच झाली नाही. पण
ती जे वागली होती; ही गोष्ट काहीकेल्या त्याला पटतच नव्हती.
थोडं शांत होऊन, थोडा विचार
करून, रवीने ईशाला फोन केला. एकेकाळी ज्या दोघांना एकमेकांशी बोलायला दिवस देखील
पुरत नव्हता ते इशा आणि रवी गेला महिनाभर एकमेकांशी बोललेसुद्धा नव्हते.
रवीचं साधं नाव पाहून
जिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची, ती आज चातक पक्षापरी रवीच्या फोनची वाट बघत
होती. तिने रवीचा फोन पहिल्या रिंग मध्येच उचलला, जणू ती या एका फोनचीच वाट पाहत
होती.
त्याने तिला काय सांगण्यासाठी फोन केला असेल? त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं असेल? रवी ईशाला माफ करेल का? ईशाने ही गोष्ट लपवून चूक केलं का? की तिला वाटणारी भीती सहाजिक होती?
तुम्हाला काय वाटतंय हे नक्की मला कळवा.
पुढे काय घडलं हे तुम्हाला सांगण्यासाठी लवकरच कथेचा शेवट घेऊन येणार आहे.
छान आहे पण पुढंच भाग कधी प्रकाशित कराल.
उत्तर द्याहटवालवकरच.. धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी. खूप आनंद होतो जेव्हा कथा प्रकाशित केल्या नंतर लगेचच पुढचा भाग प्रकाशित होण्याची तूमची आतुरता पाहून
हटवाChan aahe
उत्तर द्याहटवाKhup abhari ahe
हटवाAaj ravi chi tipanni disli nahi?🤔 😂
उत्तर द्याहटवाHa ha ha .. nakkich katha vachun zalyavar awadlyas comment karnar.
उत्तर द्याहटवा