फोनवरचंं प्रेम....
रवी – (त्याचा अत्यंत आवडता
आवाज ऐकण्यासाठीची आतुरता आणि तिच्यावरचा राग या अश्या संमिश्र भावनेनेच तो
म्हणाला...) हॅलो! मला थोडं बोलायचं आहे.
ईशाने तब्बल एका
महिन्यानंतर रवीचा आवाज ऐकला होता. तो समोर असता तर घट्ट मिठी मारली असती. इतक्या
आनंदात ती होती. पण तिने केलेल्या चुकीची जाणीवदेखील तिला होती. म्हणून तिने
पुन्हा एकदा त्याची माफी मागितली.
इशा – सगळ्यात आधी मला माफ
कर. मला माहिती आहे आपल्यात ठरलं होत की आपण काहीच लपवायचं नाही; पण तू
माझ्यापासून दूर जाशील म्हणून मी तुला अविनाश बद्दल सांगितलं नव्हत.
रवी – (तिचा तो आवाज ऐकूनच
त्याचा निम्मा राग गेला होता.) इशा ज्या कारणामुळे मी तुला माफ करावं अस तुला
वाटतंय, खरतर त्या कारणामुळे मी तुझ्यावर कधीच रागावलो नव्हतो. तुझ्या आयुष्यात
माझ्या आगोदर कोणीतरी होतं याचं वाईट मला वाटत नाहीये. तू ही गोष्ट माझ्यापासून
लपवून ठेवलीस याचं मला दुखः आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, जर काही असेल तर ते
आताच सांग. हे पहा तुझ्या या चुकीमुळे मला जे दुखः झालं ते नक्कीच माझ्या
प्रेमाहून मोठं नाहीये.
इशा – रवीचं बोलणं ऐकून
तिला दिलासा भेटला. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होता; पण आपलं माणूस न
गमावण्याचा आनंद जास्त होता.
त्या दोघांनीही गोष्टींचा
गुंतागुंत सोडवून पुन्हा एकदा नव्याने नात्याला सुरुवात केली.
पुढच्या दोन वर्षांनंतर
ईशाच ग्र्यॅजुएशन पूर्ण झालं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती आता नाशिकला जाणार होती
पुढचं शिक्षण पूर्ण करायला. तिने ही बातमी रवीला सांगितली. रवीच्या आनंदाला पारावार
नव्हता. इशा आपल्याच शहरात येणार. ही गोष्ट त्याच्या मनाला एवढी सुखावत होती की
गेले दोन तीन वर्ष तो तिच्यापासून एवढा लांब होता याचं लेश त्याच्या मनातून दूर
कुठेतरी गेलं होत.
अखेर त्याचं लाँगडिसटंस नात
संपून ते दोघे आता एकाच शहरात राहणार होते. जे काही मतभेद त्यांच्यात असलेल्या
अंतरामुळे उद्भवत होते ते कमी होणार होते. आतापर्यंत ते दोघे एकमेकांना फक्त
फोनवरून अनुभवायचे; पण आता ते सगळं बदलणार होत. ते दोघेही खूप खुश होते.
इशा नाशकात आली. रवी तिथे
असल्यामुळे ईशाला स्थिरस्थावर व्हायला मदत झाली. तिचं कॉलेज सुरळीत चालू झालं. अनेक
महिन्यांनंतर भेटणारे रवी इशा आता जवळपास रोजच भेटू लागले. त्यंना इतक्या
वर्षांपसून जे पाहिजे होत ते सगळ घडत होत. हळू हळू ईशाची ओळख रवीच्या घरच्यांशी वाढू
लागली. त्याचा मित्रपरिवार आता तिचाही झाला होता. ते दोघेही खूप खुश होते.
पण पुढे गोष्टी थोड्या बदलू
लागल्या. रवीला त्याच्या कामामध्ये अडचणी येऊ लागल्या. रवीची चिडचिड वाढू लागली.
तो तिला गृहीत धरू लागला आणि त्याचा परिणाम थेट यांच्या नात्यावर दिसू लागला.
त्यांची भांडणे वाढू लागली. ईशाचा स्वभाव मुळातच थोडा रागीट होता हे तुम्हाला
कथेच्या सुरवातीलाच समजले असेल. ती जेवढी रागीट होती तेवढीच हळवी होती. त्याच्या
अश्या वागण्याचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. त्या भांडणांमुळे त्यांच्यात अंतर
निर्माण झाले. एकाच शहरात राहूनदेखील ते क्वचितच भेटू लागले.
कधीकाळी ज्यांना
एकमेकांशिवाय न बोलता करमत नसे, आता तेच दोघे फक्त कामापुरत बोलू लागले. भेटले तरी
भांडणच. यांच्यात आलेला दुरावा आता इतरांना देखील जाणवू लागला होता. स्पष्टपणे
दिसू लागला होता.
एके दिवशी रवी आणि इशा,
रवीच्या एका नेहमीच्या मित्रासोबत गप्पा मारत चहा टोस्ट खात होते. बघता बघता
गप्पांच्या ओघात कोणत्यातरी विषयावरून रवी आणि ईशाचे मतभेद होऊ लागले. वादाचं
रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. इशा रागाने तिथून निघून गेली. रवीनेही तिला
थांबवलं नाही.
रवी आणि इशाच्या चांगल्या वाईट काळात तो सामील असायचा. त्याने रवी आणि इशाच एकमेकांवरच नितांत प्रेम पाहिलं होत. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या या जोडप्याच नात आजच्या घडीला या ठिकाणी येऊन ठेपलंय हे पाहून त्याला देखील ते पाहवले नाही.
बराच वेळ झाला इशा परत आली नव्हती.
तिचा फोन देखील लागत नव्हता. त्याने रवीला समजावलं आणि ते दोघेही ईशाला शोधायला
निघाले. तिच्या मैत्रीणीना विचारून झालं, एक दोन ठिकाणी पाहून झालं; पण इशा तिथे
नव्हती. त्याला आता तिची काळजी वाटू लागली होती. तेवढ्यात रवीच्या लक्षात आलं, इशा
टेकडीवरच्या गणेश मंदिरातच असणार. ते दोघे लगबगीने तिथे पोचले आणि खरचं रवीचा
अंदाज खरा ठरला, ती तिथेच होती.
तिला पाहून त्याच्या जीवात
जीव आला आणि रवीला समोर बघून इशाचे डोळे पाणावले. त्यादोघांना पुन्हा एकदा कळून
चुकलं की ते दोघे एकमेकांशिवाय नाहीच राहू शकत. त्याच क्षणी त्यांनी त्यांचे पूर्ण
आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
नंतर एक वर्षभरात त्यांनी
त्यांच्या नात्याबद्दल रीतसर घरी सांगायचं ठरवलं. तसं रवीच्या घरी कल्पना होतीच.
त्याने इशाबद्दल घरी सांगितलं. घरी थोड तणावाच वातावरण निर्माण झालं रवीच्या
वडिलांना हे मान्य नव्हत; पण रवी आणि इशा दोघेही ठाम होते. रवीने घरी बाबांना
मानवायचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याचे प्रयत्न यशस्वी झाले.
पण अजून एक किल्ला लढवण बाकी होत. इशाच्या घरी तिची लहान बहिण आणि एक दोन जवळच्या मैत्रिणी सोडल्या तर
कोणालाच रावीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल माहिती नव्हत.
त्या दोघांनी ठरवूनच ही
गोष्ट तिच्या घरच्यांपासून गुपित ठेवली होती. पण आता सांगण तर भाग होत. मोठ्या
हिमतीने ईशाने आई वडिलांना रावीबद्दल घरी सांगितलं. ईशाचे आई वडील दोघेही या
लग्नाला तयार नव्हते.
खूप मतभेद, खूप रडे, खूप
भांडण या सगळ्यातून वाट काढत त्याचं नात लग्नाच्या उंबऱ्यात येऊन ठेपल. अखेरीस
त्यांच्या मनासारखं घडत होत.
आणि ती वेळ आलीच..
त्यांच्या लग्नाचा दिवस.... देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, आई वडील आणि मित्रपरिवार
यांच्या समवेत, त्यांच्या या सुखद आणि खडतर प्रवासाचे क्षण, असे सगळेजण आज रवी आणि
इशाच्या गोड लग्नसोहळ्याचे साक्षीदार होते.
रवी आणि ईशाने एकमेकांना पाहिलं आणि गेली आठ वर्षे त्या दोघांच्या डोळ्यासमोरून तरळली. दोघांनाही भरून आलं.
आठवर्षांपूर्वी एका राँग नंबरमुळे या दोन मनांची ओळख झाली होती. नियतीनेच त्या दोघांना एकमेकांसाठी निवडलं होत.आज त्या दोन वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या व्यक्ती, ती दोन मनं एकत्र येणार होते.
चला तर मग रवी आणि इशा
यांना भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन आपली कथा इथेच संपवूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा