फोनवरचंं प्रेम.....
ती सुरुवात होती.
त्या
दोघांच्या नात्याची. नव्हे त्यांच्या ओळखीची.
(बाजारात एवढी जास्त गर्दी
होती. त्यात ते रिक्षवाले... जगाची घाई असते त्यांना तर, कळतच नाही. कसेही रिक्षा
चालवतात. मझ तर डोकच फिरलंय)
अशी काहीशी चिडलेल्या स्वरात
ती घरात आईला हे सगळ सांगत होती. या सगळ्यात फोन येऊन
गेला हे तिच्या ध्यानातच आलं नव्हत. नंतर तिने फोन चेक केला. तो अनोळखी नंबर होता.
कोणाचा असेल फोन? पुन्हा करु का त्या नंबरवर फोन? हा विचार करत असताना पुन्हा
त्याच नंबर वरून फोन आला. यावेळी तिने फोन उचलला.
तो – (ती काही बोलायच्या
आतच) अरे भावा, कुठे आहेस? फोन नाही काही नाही...
ती – हॅलो, कोण बोलतंय?
तो – (तिचा आवाज ऐकून तो जरा थबकला
आणि दबक्या आवाजातच म्हणाला..) मी रवी. आपण कोण बोलतंय?
ती – चिडक्या स्वरातच तिने उत्तर
दिलं; आपल्याला कोणाशी बोलायचं आहे?
तो – रजत साळुंखे, याचाच
नंबर आहे ना?
ती – मी रजत साळुंखे
वाटतीये का तुम्हाला?
(ती आधीच चिडली होती. त्यात तिच्या रागाने जणू आगीत तेलाचच काम केलं.
त्या दोघांचे फोनवरच कडाक्याचे भांडण झाले.)
आणि अशी झाली सुरुवात. ती
चिडून बोलली. तो देखील भांडला. तेव्हा त्या दोघांनाही ठाऊक नव्हत की हा कॉल पुढे
जाऊन त्या दोघांना एकत्र आणणार होता.
होय ! अगदी बरोबर ऐकलत. ते
दोघे त्या एका राँग नंबरमुळे आयुष्यभरासाठी ओळखीचे झाले.
विचारात पडलात ना? एक
चुकीचा फोन आणि आयुष्यभराचा संबंध... कसं काय बरं शक्य आहे? हल्ली तर लोकं राँग
नंबर आहे हे समजताच फोन ठवून देतात.
अहो! प्रेमाची परिभाषाच
वेगळी आहे. प्रेमाला तुम्ही कधीच एका चौकटीत बांधून ठेवू नाही शकत. ज्यांना एकत्र
यायचंच आहे त्यांना एक राँग नंबर देखील पुरेसा आहे की ओ...
चला तर मग पुढे वाचूया त्या
दोघांसोबत काय घडलं.
तर मग त्यांचा फोन कॉलवरच
संभाषण ऐकून समजलाच असाल त्यांची एकमेकांसोबाताची पहिली ओळख कश्याप्रकारे झाली ते.
फोन वर दोघेही अगदी जणू
माझी चूकच नाही अश्या आविर्भावाने भांडले होते. तिने दुसऱ्यांवरचा राग त्याच्यावर
काढला. तो देखील कमी नाही हो यात. त्यानेही चिडचिड केलीच की अनोळखी व्यातीवर. पण
नंतर त्या दोघांनाही कळून चुकलं होत. ते दोघे जे काही वागलेत ते सपशील चुकीच होत.
त्यानंतर त्याने तिला एक
मेसेज पाठवला. लिहिलं होत, माफ करा. तो मेसेज पाहून तिला स्वतःचीच लाज वाटली. ती
खजील झाली. तिने त्याला कॉल केला. जे ती वागली होती त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी,
तिने झाल्या प्रकराबद्दल माफी मागितली. जो घोळ तिच्या रागामुळे झाला होता तो
त्याला सांगितला आणि एवढ बोलून त्यांनी फोन ठेवला.
बरं एवढ सगळ तर बोलले; पण
त्या दोघांनी एकमेकांना त्यांची नावं मात्र विचारलीच नव्हती.
तिच्यासोबत हे असलं काही पहिल्यांदाच
घडलं होत. झाला प्रकार तिच्या मनातून जातच नव्हता. कोण असेल तो? कुठून बोलत असेल?
असे बरेच प्रश्न तिला पडले होते. तिकडे त्याची अवस्थादेखील काही वेगळी नव्हती.
त्याला तर राहून राहून तिचा आवाजच आठवत होता. तो तर तिच्या अवजावरच फिदा झाला
होता. कधी पुन्हा तो आवाज कनी पडेल याचाच तो विचार करू लागला. असेच पुढचे काही
महिने निघून गेले.
एव्हाना तो आपल्याला
विसरलासुद्धा असेल आणि तिला तर मी आता आठवत देखील नसेन अश्या भ्रमात ते दोघे जगत
होते. दोघांनाही एकमेकांशी बोलायची ओढ लागली होती.
शेवटी हिम्मत करून एके
दिवशी पाडव्याचं निमित्त साधून त्याने तिला शुभेच्छा द्यायला कॉल केला. त्याचा
नंबर पाहून तिने क्षणाचादेखील विलंब न करता फोन उचलला. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा
दिल्या. खुशाली विचारली. तो तर तिचा आवाज ऐकण्यात एवढा मग्न झाला होता की सगळ
बोलून झालं तरी तिला तीच नाव काही विचारलच नाही. शेवटी तिनेच तीच नाव त्याला
सांगितलं.
ती – माझ नाव इशा देवकर.
मुंबईत ग्र्यॅजुएशन करते. तुम्ही कुठून बोलताय?
तो – मी रवी. रवी देशमाने. मी
मुळचा नाशिकचा. माझे आई, वडील आणि ताई सगळे तिकडेच राहतात. मी चेन्नईला असतो.
तिथेच शिकतोय.
अश्या प्रकारे ते दोघे
एकमेकांना सणावारालाच नव्हे तर इतर दिवशीही मेसेज करू लागले. त्यांच्यातला संवाद
वाढला. आता तर दोघांनाही एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हत.
जसा वेळ मिळेल तसे ते
एकमेकांशी बोलत. त्या दोघांना दिवसही अपुरा पडत होता. असे पुढे दोन वर्ष ते एकमेकांसोबत
होते. न भेटता, स्पर्शाविना भावना फुलत होत्या. नवीन नात उलगडत होत. नंतर रवी
त्याचं शिक्षण पूर्ण करून नाशकात परत आला. तिथेच तो पुढे त्यचं काम सुरु करणार
होता. इशा आणि रवीच्या या वर्चुअल, ओनलाईन, फोनवरच्या नात्याला आता जवळपास दोनहून
जास्त वर्ष झाली होती. आत्मिक ओळख अपुरी पडायला लागली, आता त्या दोघांच भेटणं खूप
गरजेच झालं होत.
शेवटी त्यांनी भेटायचं ठरवलं.
तो तिला मुंबईत भेटायला येणार... दिवस, जागा, वेळ अस सगळ ठरलं. एकमेकांना भेटायची
आतुरता, आनंद, भीती अश्या एकत्रितपणे सगळ्या भावनांनी त्या दोघांना भंडावून सोडल
होत.
अखेर तो दिवस आला. सकाळी
पहिल्या गाडीने तो निघाला. भेटायची वेळ सकाळची नऊ वाजताची होती. रवी तब्बल दीड तास
लवरकर पोचला. त्याला खर तर मुंबई हे शहर फारस रुचत नव्हत. पण आज मात्र रवीला या
शहराच्या गर्दीत, लगबगीत आणि गोंधळ यातसुद्धा स्तब्धता, शांतता भासत होती.
तिची वाट बघताना बरेच विचार
त्याच्या मनात येत होते. तिला मी आवडेन का? इतके दिवस जिचा फक्त आवाजच ऐकला होता
तिला आज प्रत्यक्षात समोर पाहणार या विचारेनेच तो बैचेन झाला होता. एक एक सेकंद
त्याला एक तासापरी भासत होता.
नेहमी सगळीकडे उशिराने पोचणारी
इशा आज वेळेच्या आधीच घरातून निघाली. आज ज्याच्याशी आपण फक्त फोनवरच बोललो होतो
त्याला समोर बघून तिची काय अवस्था होणार होती या विचारानेच तिच्या पोटात फुलपाखरं
उडू लागली.
तिने त्याला फोन केला.
इशा – कुठे आहेस रवी तू? मी
घरातून निघाले आहे. लवकरच पोचेन आपल्या ठरलेल्या जागी.
त्याचं उत्तर आलं; मागे
वळून पहा.
तिच्या मनात एकदम धस्स
झालं. पोटात गोळा आला. तिने मागे वळून पाहिलं तर तो उभा होता. ती लाजली. तो
शहारला. दोघांनाही काय बोलावं सुचेना.
त्यादिवशी पहिल्यांदा ते
दोघे एकमेकांना फोन वरून नाही तर समोरासमोर हात मिळवून हॅलो म्हणाले.
तो स्पर्श ते दोघे कधीच
विसरू शकत नव्हते.
त्यानंतर त्यांच्या भेटी
वाढू लागल्या. त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं हे तुम्हाला देखील जाणवलं
असेलच. त्या दोघांनासुद्धा ते कळत होत पण; त्यांच्यापैकी हे कोणीच मान्य करत
नव्हत. त्यांचे मित्र मैत्रिणी त्या दोघांनाही या नात्यापासून दूर खेचत होते. असं
नात टिकत नाही. तो एवढ्या लांबचा आहे, तिच खर खोटं माहिती नाही, फसवणूक होऊ शकते.
असे अनेक सल्ले त्या दोघांना मिळत होते.
आणि इशा या सल्ल्यांची
शिकार झाली. तिला कुण्याएका मैत्रिणीने टुकार सल्ला दिला आणि ईशाने तसच केलं. ही
तिची त्यांच्या नात्यातली पहिली चूक. ईशाचा रवीवर निस्सीम विश्वास होता. ती त्याला
तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगत गेली. अगदी दिवसभर जे घडलं त्यापासून ते जे
तिच्या आयुष्यात घडून गेलंय. अगदी सगळ सगळ; फक्त एक गोष्ट तिने लपवली होती. ती
म्हणजे तीच्या आयुष्यात रवीच्या आधी एक व्यक्ती होती.
तुम्हाला काय वाटतंय की
ईशाने ही गोष्ट पुढे रवीला सांगितली असेल का? तिच्यावर एवढा विश्वास ठेवणाऱ्या
रवीला तिने ही गोष्ट न सांगून बरोबर केलं का? ही गोष्ट सांगून त्यांच्या या गोड
नात्यावर याचा कसा आणि काय परिणाम होऊ शकतो?