प्रिय आई,
गेले कित्येक दिवस तुझ्याशी मनसोक्त बोलावस वाटतयं, तुला खूप काही सांगावसं वाटतयं मग विचार केला तुला प्रत्र लिहावं.
हे फक्त पत्र नाही तर ही शब्दरूपी मी व्यक्त होत आहे.
हो मी मान्य करते की बाबांवर माझं जरा जास्तच प्रेम आहे पण तुझ्यावरच प्रेम कधी व्यक्त करता आले नाही इतकेच..
आई जेव्हापासून मी लग्न होऊन नवीन घरी आले आहे तेव्हापासून क्षणाक्षणाला जीची आठवण होत असेल तर ती तू आहेस. वयाच्या या टप्यावर आज मी एक आई, बायको, सून, वहिनी या सगळ्या भूमिका पार पाडताना डोळ्यासमोर तू तरळतेस आणि तेव्हा मला तुझ्यातला सोशिकपणा समजतोय, तुझ्यातल्या या सोशिकपणाला माझा सलाम.
आज हे पत्र लिहिण्यामागे कदाचित हे देखील कारण आहे की तू मला आज उमगलीस. खूप त्रास दिलाय ना मी तूला? Sorry गं!
आणि खूप खूप thanks... त्या हातात आणून दिलेल्या चहासाठी, सकाळी लवकर उठून डबा बनवण्यासाठी, घरी यायला उशीर झाला म्हणून केलेल्या त्या काळजीसाठी आणि मुलगी आहे म्हणून मला घरातली कामं यायलाच हवी या न केलेल्या हट्टासाठी, पावलोपावली मला सांभाळण्यासाठी आणि हो मला दिलेल्या त्या मारासाठी सुद्धा....
घरात आपण चार लोकं...प्रत्येकाचा विशिष्ठ त्रास, हट्ट, आमची भांडणं सहन करण्यासाठी, आमच्या जडणघडणीत तू दिलेल्या भक्कम पाठिंब्यासाठी..
साक्षात अन्नपूर्णा तर तू आहेसच पण कधी घाई असतानाही माझे खाण्यापिण्याचे सगळे नखरे तू पूर्ण केलेस, आज तुझ्यापासून लांब राहून नावडीची भाजी निमूटपणे खाताना डोळ्यात आलेलं पाणी तुझ्या प्रत्येक धडपडीची जाणिव करून देतं.
तुझा त्रास दिसतो गं.... पण लाडाने वेडी झालेली मी आज तुला मनापासून धन्यवाद करते.
आई तू जे काही केलंस त्या सगळ्यासाठी मी तुझी मरेपर्यंत ऋणी असेन कारण एक मध्यमवर्गीय घरातल्या मुलीला एवढी सुखं फक्त भग्यानेच मिळतात.
तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
तुझीच,

Heart touching❤
उत्तर द्याहटवा❤️
उत्तर द्याहटवा❤️
उत्तर द्याहटवाKhupch sundar..... Pratekach Jan he Sagal bolu kiwa lihu shakat nahi ... Aj tu amchya bhavnana pn shabd diles .... thank you❤️
उत्तर द्याहटवाThank you saglyanche khup aabhar ..majhya pahilya vahilya post var tumchi pratikriya vyakt kelya baddal❤️
उत्तर द्याहटवाAti sundar ... ❤️❤️❤️
उत्तर द्याहटवाBeautiful ❤️
उत्तर द्याहटवाछान पत्र लिहीलेले आहे .
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाखूप सुंदर ....... खूप relatable पोस्ट आहे
उत्तर द्याहटवाKeep going ichhita ❤️💯